अहमदनगर जिल्ह्यातील हे धरण ओव्हरफ्लो; शेतक-यांनी केला जल्लोष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे घोड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाभक्षेत्रातील युवा शेतकऱ्यांनी धरणावर जाऊन या जलपूजन केलं.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू असून घोड धरण ओव्हरफ्लो झाले. तर काहींनी सोशल मीडियावर जल्लोष केला आहे.

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ७० गावांना वरदान ठरणारे घोड धरण सोमवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले. धरणाचे दोन दरवाजे उघडून घोड नदीपात्रात ८५० तर दोन्ही कालव्यांना प्रत्येकी २०० क्युसेकने पाणी सोडले आहे.

गेल्या वर्षी घोड धरण फ्रेंडशिपच्या दिवशी ओव्हरफ्लो झाले होते. यंदा २० दिवस उशिरा म्हणजे २४ आॅगस्टला ओव्हरफ्लो झाले आहे.

तीन तालुक्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारे घोड धरण १९६८ पासून म्हणजे ५३ वर्षात ३७ वेळा ओव्हरफ्लो झाले आहे. २०१२ सर्वात कमी म्हणजे धरण ४८ टक्के भरले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24