‘या’ मृत महिलेला न्याय मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात शहापूर (जि. ठाणे) येथील डॉ.विठ्ठलराव मनोहर बनसोडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने एका महिलेस जीव गमवावा लागला होता.

सदर प्रकरणी चौकशी करुन डॉ.बनसोडे यांना निलंबीत करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने वांजोळी (ता. नेवासा) येथे शिवारात आमरण उपोषण करण्यात आले होते.

उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शनिवार (दि.५ सप्टेंबर) रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या गंभीर घटनेची माहिती घेऊन ठाणे येथील संबंधीत अधिकार्‍यांशी चर्चा केली.

तसेच तातडीने ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी उपोषण कर्त्यांना डॉ. बनसोडे यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक,

सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आश्‍वासन दिल्याने छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले.

काय आहे प्रकरण? जाणून घ्या… शहापूर (जि. ठाणे) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मीना मिश्रा या महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.

मयत मीना मिश्रा यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या डॉ. बनसोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात

यावे या मागणीसाठी छावा संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब शंकर काळे हे 1 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24