गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी केली हि मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले असून, फक्त उसाचाच त्यांना आधार आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांना उसाचा दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की कोरोनामुळे बळीराजा अडचणीत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक पिके वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्यांना आता केवळ उसाचाच आधार आहे. त्यामुळे 2020-21चा उसाचा दर हंगाम सुरू करण्यापूर्वी जाहीर करावा. तसेच ऊसखरेदी करात यावर्षी सूट द्यावी.

साडेतीन व 50 किलोमीटरपुढील ऊसतोड व वाहतूक दर जाहीर करावेत व ते “एफआरपी’मधून वजा होत असल्याने किमान शासनमान्य असावेत.

बाहेरील 50 किलोमीटरपुढील ऊस वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर टाकू नये. वजनकाटे तपासून घ्यावेत, साखर व अन्य उत्पादने विचारात घेऊन 80:20 या प्रमाणात ऊसदर घोषीत करावा आदी मागण्या केल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24