या नाराज कोविड रुग्णालयाने मनपाबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता धोका पाहता महापालिकेने बंद केलेले त्यांचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र यामध्ये एक महत्वाची अडचण समोर आली आहे.

कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या बुथ हॉस्पीटलने महापालिकेसोबत काम करण्यास इच्छूक नसल्याचे समजते. कोरोनाच्या काळात खात्रीचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयाकडे पाहू लागले.

बुथ हॉस्पीटल देत असलेली सेवा पाहता त्यांना मदतीचा ओघही वाढला. या मदतीचा ओघ अद्यापही सुरू आहे. महापालिकेच्या सहकार्याने बूथ हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार केले जात होते.

कोरोना कहर कमी झाल्यानंतर बुथ हॉस्पीटलने त्यांचा झालेला खर्चाबाबत महापालिकेकडे मागणी केली. यात काही वाद निर्माण झाले. तांत्रिक कारणांवर बोट ठेऊन महापालिकेने रक्कम देण्यास विलंब केला किंवा हे बील बाजुला ठेवले.

बुथ हॉस्पीटलला त्यांचे पैसे द्यावेत, यासाठी मध्यंतरी महापालिकेला काही शिष्टमंडळांनी भेटून मागणी केली होती. मात्र सकारात्मक निर्णय न मिळाल्याने महापालिकेचा अनुभव बघता बूथ हॉस्पिटल यापुढे महापालिकेसोबत काम करण्यास इच्छूक नसल्याचे समजते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24