अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अामदार आशुतोष काळे यांनी ऊस दराबाबत निर्णय जाहीर करून २०२१-२२ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन अडीच हजार रुपयांचा दर जाहीर करून ऊस दराच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पूजन करून व गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, एम. टी. रोहमारे, कारभारी आगवण, नारायण मांजरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, संभाजीराव काळे,
कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, चिफ अकौंटंट सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे अादी उपस्थित हाेते.
अामदार काळे यांनी ऊस दर जाहीर करून कामगारांना देखील मागील वर्षीप्रमाणे १८ टक्के बोनस देण्याचे जाहीर केले. अामदार काळे म्हणाले, मागील दोन हंगामामध्ये ऊस उत्पादन व साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले.
मात्र, साखर निर्यातीस दिलेला सकारात्मक प्रतिसाद व इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात आल्यामुळे साखर साठे नियंत्रित ठेवता आले. चालू गळीत हंगामात सात लाख मेटीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून कारखाना कार्यक्षेत्रात १० हजार ५०० हेक्टर क्षेत्राची नोंद झाली.
टप्प्प्याटप्प्याने विकासाची कामे मार्गी लावण्यात येणार
कोरोनाचे संकट व चार–चार चक्रीवादळांच्या व अतिवृष्टी, महापूर अशा आपत्तीपुढे न डगमगता नुकसानीची भरपाई राज्य सरकार देत आहे.
माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील मोठ्या प्रमाणात मतदार संघासाठी निधी आणला आहे. मात्र, त्यांनी कधी त्याची प्रसिद्धी केली नाही व मला देखील प्रसिद्धीची हाव नाही.
दोन वर्षातील दीड वर्ष कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात गेले. विकासाची सर्व कामे एकाच वेळी होणार नसली तरी टप्याटप्याने सर्वच विकासकामे मार्गी लावणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.