अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हे’ पहिलं गाव, सिलेंडर नव्हे पाइपलाइनद्वारे गॅस देण्यास सुरुवात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  एलपीजी गॅस सिलेंडर जेव्हा गॅस टाकी मधून गावागावात आले होते त्यावेळी क्रांती झाली होती. सिलेंडर मिळण्यासाठी फार अडचणी यायच्या. आता श्रीगोंदा शहरात पाईपलाईन मधून घरापर्यंत पीएनजी गॅस मिळणार आहे.

ही मोठी क्रांती आहे. या प्रकल्पाला प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी श्रीगोंदा शहरात पीएनजी गॅसचा प्रारंभ करताना सांगितले.

श्रीगोंदे शहरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या पीएनजी आरोचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर श्रद्धा जेटली, विभागीय मॅनेजर राजीव सचदेवा, स्वप्नील मेटकर, नगर जिल्हा सेल्स मॅनेजर युवराज फळे, नगरसेवक महावीर पटवा, समीर बोरा, गांधी पेट्रोलियमचे संचालक सचिन गांधी, सुरेंद्र गांधी आदी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार म्हणाले, पाईप मधून गॅस येणार असल्याने धोका कमी आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच काम कंपनी करते. ग्राहकांना सहज घरात गॅस उपलब्ध होणार आहे. सेवा उत्तम मिळली तर पीएनजी गॅस क्रांतीकारी ठरेल असे ते म्हणाले.

कंपनीच्या जनरल मॅनेजर श्रद्धा जेटली म्हणाल्या, भारत सरकारने पीएनजी गॅस लॉन्च केला.नैसर्गिक गॅस उपलब्ध होत आहे हे महत्त्वाचे आहे. घरांमध्ये सुरक्षित गॅस मिळेल. सर्वांनी हे कनेशन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवक महावीर पटवा म्हणाले, पीएनजी सर्व शहरात पोहचलो आहे. श्रीगोंदेपासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. घरोघरी पीएनजीची मागणी आहे असे ते म्हणाले.

दरम्यान हा प्रयोग सर्वत्र राबवला जाणार आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे हा सर्वात आधी सुरवात करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वत्र अशा पद्धतीचे जाळे पसरेल हे मात्र नक्की.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office