अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही तालुक्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.
मात्र जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात लॉकडाऊन केला जाऊ नये यासाठी माजी आमदार पुढे सरसावले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक
यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेत रविवार (ता.१३) पासून पुढील आठ दिवस शहरात लाॅकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला. परंतु सदर निर्णयानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे
यांनी आज लाॅकडाउनला विरोध दर्शवत व्यापार्यांना दुकाने खुले ठेवण्याचे आवाहन केले. या संदर्भात मुरकुटे म्हणाले, शहरात लाॅकाडाउन करुन काही फायदा होणार नाही. माझ्या कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
जे नागरीक नियम पाळणार नाही. त्यांना कोरोनाचा संर्सग होण्याची दाट शक्यता आहे. आता पोलिस प्रशासनही कंटाळले आहे. आतापर्यंत नागरीकांना कोरोना संसर्गाचे गांर्भीय कळाले आहे.
त्यामुळे शहर लाॅकडाउन करुन फारसा उपयोग होणार नाही. ज्यांना विनाकारण फिरायचे आहे, ते फिरणार आहे. सरकारकडून सर्व सेवासुविधा खुल्या केल्या जात असताना श्रीरामपूरात लाॅकडाउन करण्याचा निर्णय घेणारे हे कोण,
असा सवाल मुरकुटे यांनी उपस्थित केला आहे. लाॅकडाउन करुन गरीबांनी भिक मागायचे का. नियमांचे पालन करुन गरीबांना पोट भरु द्या, असे आवाहन मुरकुटे यांनी केले आहे. त्यांनी शहरात लाॅकडाउन करण्यास विरोध दर्शविला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved