अहमदनगर बातम्या

‘हे’ शेतकऱ्यांना लुटणारे सरकार; शेतकऱ्यांना विम्याचे पैसे न दिल्यास आमदार तनपुरे यांचा आंदोलनाचा इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पीकविमा योजनेमधील नुकसान भरपाईचा प्रस्ताव देताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आर्थिक गैरव्यवहार केला आहे. आर्थिक लाभ देणाऱ्यांनाच पीकविमा मंजूर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गेल्या खरीप हंगामातील विम्याचे पैसे अद्यापि मिळाले नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांना लुटणारे आणि फसवणूक करणारे आहे. कृषी कर्मचारी हे भाजपच्या हातचे बाहुले झाले का, असा सवाल आमदार तनपुरे यांनी केला.

एक रुपयात पीकविमा भरता येत असल्याने असल्याने खरीप हंगामात पीक विमा योजनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. यासाठी – पीक विमा कंपनीकडे हप्ता जमा करण्यात आला.

त्यातुलनेत परतावा देताना कंपनीद्वारा बाधित अनेक शेतकऱ्यांना डावलले जात असल्याच्या तक्रारी आमदार तनपुरे यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आ. तनपुरे यांनी या तक्रारी घेऊन कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, शेतकऱ्यांची फसवणूक करून कृषी विभागाचे कर्मचारी व विमा प्रतिनिधी पैसे घेऊन पीकविम्याचा लाभ देत आहेत. दोषींवर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा तुमच्या दारात बसून आंदोलन करण्याचा इशारा आ. तनपुरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला.

पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांकडून हप्तेखोरी करीत असून, एक रुपयात पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून पाचशे रुपये उकळले जात असून, यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचाही आरोप तनपुरे यांनी केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रफिक शेख, पाथर्डी येथील कृषी विभागाच्या पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल गवळी, अमोल वाघ, इलियास शेख, पिनू मुळे, सुनील अकोलकर, संभाजी लोंढे, अंबादास डमाळे, पंढरीनाथ चोथे, राजेंद्र पाठक, सुनील लवांडे, हेमंत पडुळे, अमोल घोरपडे आदी उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची पडताळणी केली असता, पीकविमा योजनेत विमा कंपनीने फसवणूक आणि शेतकऱ्यांची अडवणूक केल्याचे उघड झाले आहे.

पीकविमा योजनेमधील नुकसान भरपाईचा प्रस्ताव देताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आर्थिक गैरव्यवहार केला आहे. आर्थिक लाभ देणाऱ्यांनाच पीकविमा मंजूर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गेल्या खरीप हंगामातील विम्याचे पैसे अद्यापि मिळाले नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांना लुटणारे आणि फसवणूक करणारे आहे. अशी टीका देखील त्यांनी केली.

Ahmednagarlive24 Office