अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बिनविरोधाचा पर्याय निवडला जात आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी राक्षसवाडी खुर्द आणि निमगाव गांगर्डा या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तर तालुक्यातील एकूण ५०४ पैकी ६८ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. दहा गावातील १९ प्रभागातील मिळून हे ६८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
५६ पैकी ५४ ग्रामपंचायतीत चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. अनेक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व खा. सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांत घमासान पहावयास मिळणार आहे.
दरम्यान राक्षसवाडी खुर्द येथे भाजपचे नेते धनराज कोपनर यांच्या विशेष प्रयत्नातून ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. निवडणूक बिनविरोध होताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.