अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे.
यातच गावागावातिल राजकारणे, भावकीचा वाद, या गोष्टींना फाटा देत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा हि मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान नुकतेच आमदार रोहित पवारांचा मतदार संघ जामखेडमध्ये एक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील खूरदैठण ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली आहे.
बाजार समितीचे माजी संचालक महादेव डूचे , शहाजी अण्णा डूचे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने खुरदैठण ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली आहे.
या सर्व ग्रामपंचायत वरती राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व आहे . नवनिर्वाचित सदस्य प्रभाग क्रमांक. १ मधून अश्विनी बाळासाहेब ठाकरे, निर्मला गोकुळ डूचे,
दादासाहेब शहाजी डूचे, प्रभाग क्रमांक २ मधून मंदाबाई विठ्ठल डूचे, मनीषा अविनाश ठाकरे, प्रभाग क्रमांक ३ मधून हनुमान कुंडलिक देवकाते, सुनीता मोहन डूचे यांचा समावेश आहे.