अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- आज राज्यातील एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.
गावची गावे अंधारात आहेत.आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?.
अशी संतप्त टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आज विवाहबंधनात अडकणार आहे.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला.
यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला डान्स सध्या लक्षवेधी ठरत आहे.
यावरुनच भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.