अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्र व राज्य शासन विविध विकास योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन देत असल्याने गावच्या विकासात ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची आहे. काळानुसार राजकारण बदलत आहे.
निवडणुकांमध्ये चुरस वाढत आहे. मात्र नगर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक सातव्यांदा बिनविरोध झाली असून गावकऱ्यांनी गेल्या तीस वर्षांची परंपरा कायम राखली आहे.
याचा गावच्या विकासावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. वारूळवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध पार पडल्यानंतर नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक फार वेगळी असते. जय पराजय होत असतो, परंतू चुरशीतुन नात्यागोत्यात वितुष्ट निर्माण होते. त्याचा गावच्या विकासावर विपरीत परिणाम होतो.
या ऊलट ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाल्यास एकजुटीने, एक विचाराने गावचा विकास साधता येतो. परंतू काहींना निवडणुक व्हावी, गावात दोन गट असावेत असे वाटत होते.
पैशांचे आमिष दाखवून बळच दुसरा पॅनल तयार करण्याचा प्रयत्न काहींनी चालविला होता. मात्र तो प्रयत्न हाणून पाडत वारुळवाडी गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवुन निवडणुक बिनविरोध केल्याबद्दल कर्डिले यांना सर्वांचे आभार मानले.