अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवून मुसंडी मारली आहे.
जिल्ह्यात ३२५ पेक्षाही जास्त ग्रामपंचायतीवर आपले एकहाती विजय मिळवून ग्रामीण भागातील जनतेने पुन्हा एकदा शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे.
असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे घोषीत केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकारी यांनी चांगले काम केलेले असून,
कोविडच्या काळात केलेले कार्य या सर्वच कामाची पावती जनतेने ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली गेली असल्याचे नमूद केले आहे.