या ठिकाणी सरपंचपदी महिलांचे वर्चस्व कायम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. तसेच निवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले आहे. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार? दरम्यान नुकतेच काही ठिकाणी सरपंच पदांची घोषणा करण्यात आल्या आहेत.

राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी जाहीर कारण्यातआल्या आहेत. यामध्ये 13 महिलांना तर 12 पुरुषांना गावचे सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. सरपंच व उपसरपंच पदाच्या गाव निहाय झालेल्या निवडी पुढील प्रमाणे आहेत.

तिसगाव- आशा घुले (सरपंच), मीनाताई कडू (उपसरपंच). सावळीविहीर खुर्द- अशोक जमधडे (सरपंच), सपना वर्पे (उपसरपंच). लोणी बुद्रुक- कल्पना मैड (सरपंच), गणेश विखे (उपसरपंच). अस्तगाव- नवनाथ नळे (सरपंच), गायत्री जेजुरकर (उपसरपंच). एकरूखे- जितेंद्र गाढवे (सरपंच), शांताबाई सातव (उपसरपंच).

ममदापूर- अनिता कदम (सरपंच), दिपाली भालेराव (उपसरपंच). चंद्रपूर- अण्णासाहेब पारधे (सरपंच), दिपाली तांबे (उपसरपंच). रांजणगाव खुर्द- सुनीता कासार (सरपंच), नीलिमा गाढवे (उपसरपंच). कोल्हार बुद्रुक- निवेदीता बोरुडे (सरपंच), सविता खर्डे (उपसरपंच). आडगाव बुद्रुक- पुनम बर्डे (सरपंच), अशोक लहामगे (उपसरपंच).

नांदूर- प्रीतम गोरे (सरपंच), सुदर्शन पारखे (उपसरपंच). पिंपळवाडी- रामनाथ तुरकणे (सरपंच), सुनीता तुरकणे (उपसरपंच). केलवड- संगीता कांदळकर (सरपंच), विशाल वाघे (उपसरपंच). पाथरे बुद्रुक- उमेश घोलप (सरपंच), शाहिना अरिफ शेख (उपसरपंच). पिंपरी लोकाई- लक्ष्मण सोनवणे (सरपंच), भामाबाई गायकवाड (उपसरपंच).

लोणी खुर्द- जनार्धन चंद्रभान घोगरे (सरपंच), अर्चना अनिल आहेर (उपसरपंच). रामपुरवाडी- संदीप सुरडकर (सरपंच), मंदा काळे (उपसरपंच). जळगाव- शिवाजी एलम (सरपंच), कल्पना चौधरी (उपसरपंच).

गोगलगाव भाऊसाहेब खाडे (सरपंच), अनिल चौधरी (उपसरपंच). भगवतीपूर- दत्तू राजभोज (सरपंच), प्रकाश खर्डे (उपसरपंच). वाळकी- सोनम शेख (सरपंच), राजेंद्र दत्तात्रय विखे (उपसरपंच). हनुमंतगाव- मनीषा माळी (सरपंच), प्राजक्ता अनाप (उपसरपंच). शिंगवे- अनिता बाभूळके (सरपंच), प्रशांत काळवाघे (उपसरपंच).

बाभळेश्वर- विमल म्हस्के (सरपंच), अमृता मोकाशी (उपसरपंच). हसनापूर- छाया बारसे (सरपंच), अफजल शौकत पटेल (उपसरपंच) याप्रमाणे नूतन सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी पार पडल्या असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24