अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : नाशिक – पुणे – मुंबईच्या विकासात व औद्योगिकीकरणात मोलाची भर टाकणाऱ्या नाशिक -पुणे रेल्वे मार्गास अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सतत पाठपुरावा केला होता.
अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. महाराष्ट्राच्या विकासात महत्वाच्या ठरणार्या मुंबई-पुणे -नाशिक हा कॅरिडोअर अत्यंत महत्त्वाचा असून नाशिक,
पुणे रेल्वे ही अत्यंत महत्त्वाची होती. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खासदार सदाशिवराव लोखंडे, डॉ.अमोल कोल्हे, नाशिकचे खासदार व या विभागातील पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
या रेल्वेमार्गामुळे नाशिक व पुणे ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या लोहमार्गाची एकूण लांबी २३१.६७ कि.मी.असून त्यापैकी १८० कि.मीचे सर्वेक्षणही पूर्ण झालेले आहे.
नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर या भागातून हा रेल्वेमार्ग निश्चित झालेला असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची मंजुरी लवकर होणार असून, कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची प्रकल्प खर्चास मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews