अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील साखर कारखानदारी अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन वाढले पण बाजारात साखरेस मागणी नाही.
अगस्ती साखर कारखान्याने प्रतिटन ५०० ते ६०० रुपये आर्थिक नुकसान सहन करून एफआरपीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर दिले.
जिल्हा सहकारी बँकेने वेळोवेळी सहकार्य केल्यानेच अगस्तीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक ऊसदर दिले आहेत. सर्वांच्याच योगदानामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २८ वा गळीत हंगामाचा बॅायलर अग्निप्रदिपन समारंभ रविवारी पार पडला. यावेळी गायकर बोलत होते. कार्यक्रमास अगस्तिचे विद्यमान अध्यक्ष मधुकर पिचड, योगी केशवबाबा चाैधरी,
वीरगावकर, अगस्तिचे जेष्ठ संचालक मीनानाथ पांडे, कचरू शेटे, राजेंद्र डावरे, महेश नवले, प्रकाश मालुंजकर, सुनील दातीर, सुधाकर देशमुख, गुलाब शेवाळे, बाळासाहेब ताजणे,
भास्कर बिन्नर, साै. सुरेखा देशमुख, साै. मनिषा येवले, अशोक आरोटे, अशोक देशमुख, रामनाथबापू वाकचाैरे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी व शेतकरी उपस्थित होते.
गायकर म्हणाले, अगस्ती बंद पडणार असल्याबद्दलची चर्चा निरर्थक होती. अगस्तिला शासनाकडून २५०० वरुन ३५०० टन प्रतिदिन ऊस गाळपाची मंजूरी मिळाली, असे गायकर म्हणाले.