Ahmednagar News : नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथील राजयोग हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबलेल्या दोन मित्रांना लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. तसेच तुम्ही परत येथे दिसलात तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे.
दरम्यान या मारहाणीत मच्छिंद्र हरीभाऊ खाडे (वय ४१ रा. मोहोज बु. ता. पाथर्डी) व वैभव प्रकाश भालेराव (वय २९ रा. खोसपुरी ता. नगर) असे जखमी झालेल्या मित्रांची नावे आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान जखमी खाडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश हरीभाऊ कदम, कैलास आव्हाड (पूर्ण नाव नाही, दोघे रा. मजली चिंचोली, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मच्छिंद्र खाडे, व वैभव भालेराव हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. ते रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथील राजयोग हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबले होते.
त्याच वेळी नीलेश व कैलास तेथे आले व त्यांनी मच्छिंद्र यांना शिवीगाळ केली. विनाकारण शिवीगाळ करत असल्याचा मच्छिंद्र खाडे यांनी जाब विचारला असता त्याचा राग येऊन नीलेश व कैलास यांनी धक्काबुक्की करून पाईपने मारहाण केली.
मारहाण होत असल्याचे पाहून वैभव भालेराव मध्ये आले असता त्याला देखील पाईपने मारहाण करून जखमी केले. तुम्ही परत येथे दिसलात तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारहाणीत मच्छिंद्र खाडे, व वैभव भालेराव हे दोघही जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
उपचारादरम्यान जखमी खाडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नीलेश हरीभाऊ कदम, कैलास आव्हाड (पूर्ण नाव नाही, दोघे रा. मजली चिंचोली, ता. नगर) या दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.