जामखेडला हॉटस्पॉट घोषित केल्याने आ.रोहित पवार यांनी केले हे काम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड : विविध प्रश्नांसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आढावा घेतला.

मतदारसंघात असलेल्या अनेक प्रश्नांवर आ.पवार यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सुचनाही केल्या. यावेळी आ.पवार यांनी कर्जत येथील काही स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या.

कोणत्याही व्यक्तीवर धान्य वाटपात अन्याय होणार नाही, शासनाच्या निकषानुसारच धान्याचे वाटपाच्या सुचना केल्या. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत अशांना आ.पवार व आलेल्या मदतीतून धान्य पुरवले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेकडुन विशेष काळजी घेण्यात यावी. अवैध धंदे असतील त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला देण्यात आले.

आरोग्याबाबत काळजी घ्यावी. जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. जामखेडला हॉटस्पॉट घोषित केल्याने आ.पवार यांनी संपूर्ण शहरात फेरफटका मारत तेथील लॉकडाऊन स्थिती जाणुन घेतली.

पुढिल काळात एकही रुग्ण आढळणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. आता शहरात यापुढे आणखी कडक नियमांची अंमलबजावणी करावी लागेल असे आ.पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

कोरोनाच्या नियोजनामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्यात प्रशासनाकडुन थोडा विलंब झाला असेल तरी यापुढे असे करून चालणार नाही.

त्यामुळे लवकरात लवकर टँकर द्यावे लागतील असे सांगत मतदारसंघातील ज्या-ज्या भागात पाणीटंचाई आहे अशा गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या.

अहमदनगर लाईव्ह 24