अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- कोरोना महामारीमुळे व्यापार पेठा अनेक दिवस बंद होत्या. यामुळे शेतकरी हवालील झालेला शेतकरी आर्थिक चिंतेत होता. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांची उत्पदकता वाढून आर्थिक बळकटी मिळावी यासाठी पवार पिता- पूत्रांचा वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. शेती शाश्वत व्हावी, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाच्या माहिती अभावी होणारी परवड, घसरलेली उत्पादकता रोखावी, शेतकऱ्यांना निश्चित दिशा मिळून उभारी मिळावी, त्यांच्या उत्पन्नात विक्रमी वाढ व्हावी,
बाजारपेठेत पोहचून चांगले पैसे मिळावेत याकरिता कांदा पीक परिसंवादाचे अयोजन केले आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिवसात दोन ठिकाणी तर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी दोन ठिकाणी स्वतंत्र कांदा पीक परिसंवाद होत आहेत. हा परिसंवाद कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
जाणून घ्या या परिसंवादाचे वेळापत्रक कसे असणार परिसंवादाचा शुभारंभ शुक्रवारी (ता. 15) मिरजगाव (ता. कर्जत) येथे होणार असून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 पर्यंत हा परिसंवाद चालणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3.00 ते 7. 00 या वेळेत तालुक्यातील कोरेगाव येथे त्याभागातील शेतकऱ्यांसाठी परिसंवाद होणार आहे.
तर शनिवारी (ता. 17) जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता दोन ठिकाणी परिसंवाद होणार आहे. यामध्ये सकाळी 9.00 ते 1.00 या वेळेत आरणगाव (ता. जामखेड) येथे तर दुपारी 3.00 ते 7.00 यावेळेत झीक्री (ता. जामखेड) येथे दुसरा परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या निमित्ताने यांचे असेल उपस्थिती आमदार रोहित पवार,
अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजी जगताप, आत्मा प्रकल्प संचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रविण गवांदे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर (कर्जत), तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे (जामखेड) उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved