यंदाच्या बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कर्जत तालुक्यासह शहरात श्रावणी पोळा साजरा झाला असून यंदा सर्व सणांसह पोळ्यावरही कोरोनाचे सावट जाणवले.

कर्जत तालुका परिसरात बहुतांश भागात श्रावणी पोळा साजरा केला जातो, तर मोजक्या भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो.

मंगळवारी श्रावणी पोळा साजरा झाला. शेतकऱ्याचे पशुधन असलेली जनावरे यांचा हा सण. परंतु कोरोना महामारी संकटाने बैल पोळ्यावर त्याचे सावट ग्रामीण भागासह शहरातही जाणवले.

दरवर्षी झूल, रंगरगोंटी आणि वाजत गाजत गावांच्या वेशीवर भरणारा पोळा आज मात्र पोळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांच्या वेशी सुन्या वाटत होत्या. ढोल ताशा, हलगीचा नादही यंदा घुमला नाही.

शेतकरीही काहीसा नाराज दिसत होता. आपआपल्या घरी जनावरांना पोळीचा नैव्यद्य भरवण्यात आला. यंदा पाऊस पाणी पुरेसा असल्याने यंदा पोळा उत्साहात साजरा झाला असता.

मात्र, कोरोनाचे रुग्ण शहरासह गावांत, खेड्यात सापडत असल्याने या कोरोनाने पोळ्यावर मोठे सावट निर्माण झाले. अशा परिस्थितीत पोळा साजरा केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24