विखे गटाची ३५ वर्षांची सत्ता थोरात गटाने ताब्यात घेतली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने अनेक वर्षे विखेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या १४ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला. व कनोली, मनोली या थोरात गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींवर विखे गटाने वर्चस्व सिद्ध केले.

संगमनेर तालुक्यातील ९४ पैकी थोरात गटाच्या भोजदरी, निमगाव टेंभी, निमगाव बुद्रूक, आंबी खालसा या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

आमदार राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघातील झरेकाठी, चिंचपूर, ओझर बुद्रूक, शेडगाव, पानोडी, चणेगाव ग्रामपंचायतीत थोरात समर्थकांनी बाजी मारली, तर कनोली, औरंगपूर, मनोली, डिग्रस या ग्रामपंचायती विखे समर्थकांनी जिंकल्या.

काही ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले. मात्र, मंत्री थोरात गटातच या लढती होत्या. ३२ वर्षे बिनविरोध होणाऱ्या सांगवी ग्रामपंचायतीची निवडणूक या वर्षी झाली, तर चिंचपूर ग्रामपंचायतीत वर्चस्व असणाऱ्या विखे गटाची ३५ वर्षांची सत्ता थोरात गटाने ताब्यात घेतली.

यशोधन संपर्क कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार महसूल मंत्री थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, विजय हिंगे,

विठ्ठलदास आसावा, मिनानाथ वर्पे यावेळी उपस्थित होते. इंद्रजित थोरात यावेळी म्हणाले, निवडणुकीनंतर कोणतेही मतभेद न ठेवता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. तालुक्यातील जनतेचा विश्वास पाठिशी असून सुसंस्कृत राजकारण व विकासकामांतून संगमनेर तालुका राज्यात अग्रगण्य ठरला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24