त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार न्याय…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जायकवाडी धरणाचे पाणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील 22 गावातील संपादीत नसलेल्या शेत जमिनीत येत असल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते.

या परिस्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. असंपादीत केलेल्या क्षेत्रात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. या बाबत महसुल, जायकवाडी जलफुगवटा विभाग व कृषी विभाग यांनी आदेश काढून धरणग्रस्त भागातील शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

जायकवाडी धरणाचे पाणी मागील वर्षी शेतातील उभ्या पिकात शिरल्याने शेतक-यांच्या हातून दोन्ही पिके गेली. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले व दहिगाव ने परिसरातील शेतक-यांनी जायकवाडी प्राधिकरणविभागाकडे वर्षभर पाठपुरावा केला.

मात्र कृषी, महसूल विभाग व जायकवाडी प्राधिकरण यांच्यातील टोलवाटोलवीमुळे अद्यापही शेतक-यांच्या पदरी नुकसान भरपाईची रक्कम पडण्यास अडचण झाली. यावर्षी शेतक-यांनी एक महिन्यापासून पंचनामे करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडे निवेदने दिली.

त्यानंतर शेवगावच्या तहसीलदारांनी कृषी व महसूल विभागातील कर्मचा-यांचे संयुक्त पथक नेमुण पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार क-हेटाकळी, खानापूर, एरंडगाव, दहिफळ, लाखेफळ, कर्जत खुर्द, ढोरहिंगणी, बोडखे, ताजनापूर, खुंटेफळ, दादेगाव, शेवगाव, खामगाव, हिंगणगावने, शहरटाकळी, ढोरसडे,

देवटाकळी, दहिगांव ने, भाविनिमगाव, घेवरी व देवळाणे या गावातील जायकवाडीच्या पाण्यामुळे बाधीत झालेल्या पिकांचे पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक व मंडलाधिकारी यांच्या मार्फत केले जाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24