मास्क न वापरणाऱ्यांकडून झाला ‘इतका’ दंड वसूल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- आदेश देऊनही अनेकजण मास्क न वापरता रस्त्यांवर फिरतात. त्यामुळे मनपाच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला गती दिली आहे.

गुरूवारी दिवसभरात सुमारे साडेदहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चार पथके नेमली आहेत.

प्रभाग १ ते ४ समित्यांसाठी ही पथके आहेत. बुधवारी पथकाने कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. गुरूवारीही पथकाने कारवाई सुरूच ठेवली.

सावेडी प्रभाग समिती १ मध्ये १६ नागरिकांवर कारवाई करुन सुमारे ८ हजारांचा दंड पथकाने वसूल केला. शहर प्रभाग समिती नं. २ मध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे २३०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सकाळी सातपासून भाजीपाला विक्रेत्यांमधे सामाजिक अंतर न ठेवणारे, तोंडाला मास्क न वापरणारे, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24