Ahmednagar News : आंदोलनाची नौटंकी करून प्रश्न सुटत नाही त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. विरोधी लोक सातत्याने आपण केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. फक्त आंदोलनाची नौटंकी करून प्रश्न सुटत नाही त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.
राज्यमंत्री पदाच्या काळात ज्यांना काम करता आले नाही, ते आता केवळ न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आंदोलनाची नौटंकी करत असल्याची टीका माजी आमदार शिवाजीराव कर्डीले जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली.
मुळानगर येथे माजी मंत्री कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर पाणी योजना तसेच मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या पंप हाऊसवर जाऊन तेथील पंपांची लाभार्थी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बुऱ्हाणनगर व इतर चौदा गाव पाणीपुरवठा योजना व मिरी- तिसगाव पाणीपुरवठा योजना नवीन पंप बसवून लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अनेक वर्षांपूर्वीचे जुने पंप असल्यामुळे हव्या त्या दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता या योजनेच्या जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पंपांची तातडीने मागणी केली होती. नवीन पंप बसवून तसेच या योजनांचे रायझिंग मेन व वितरिकांचे कामे लवकर पूर्ण करून लाभार्थी गावातील लोकांना तातडीने सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
कर्डिले म्हणाले, १९९५ ला भाजप-सेनेचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी युती सरकारच्या काळात बुन्हाणनगर व मिरी-तिसगाव पाणी योजना सुरू झाली. यावेळी राहुरी येथील गावांना देखील पाणी दिले. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. दोन्ही योजनेचे पंप नादुरुस्त झाले. त्यामुळे पाण्याची अडचण निर्माण झाली.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चारही नवीन पंप बसविण्याचे काम सुरू आहे. विरोधी लोक सातत्याने आपण केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. फक्त आंदोलनाची नौटंकी करून प्रश्न सुटत नाही त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.
त्यांच्या राज्यमंत्री पदाच्या काळात ज्यांना काम करता आले नाही, सध्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व अजित पवार यांच्या महायुती सरकारच्या माध्यमातून बस स्थानकाचे काम झाले त्याचेही श्रेय हे घेतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.