अहमदनगर बातम्या

विकासकामात अडथळे आणणाऱ्यांनी आजपर्यंत साधे गुऱ्हाळ देखील सुरु केले नाही; आमदार राम शिंदे यांच्यावर टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जत जामखेडमध्ये बदल होत आहेत. मात्र काही मंडळींना ते कामे रुचत नाहीत. आमदार राम शिंदे यांनी साधे गुऱ्हाळ देखील सुरु केले नाही.

मात्र विकासकामात अडथळे आणण्यासाठी ते नेहमी पुढे सरसावतात. मागील काही वर्षांपूर्वी आमदार शिंदेंनी मोठ्या थाटामाटात सूतगिरणीचे भूमिपूजन केले. त्यानंतर पुढे काही झालेच नाही, असे टिकाश्र बारामती ऍग्रोचे व्हाईस चेअरमन गुळवे यांनी आमदार राम यांच्यावर सोडले.

श्रीराम शुगर येथे ऊस परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, श्रीराम शुगर हा कारखाना बारामती ऍग्रोने घेऊ नये म्हणून आमदार राम शिंदे यांनी खूप अडथळे आणले. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीराम शुगर कारखाना घेतला.

यावर्षी प्रतिदिनी २५०० टनाप्रमाणे ३३ लाख ५२ हजार टन क्रशिंग झाले. शेतकऱ्यांना २९०० रुपये प्रतिटन उच्चांकी दर दिला, पुढील वर्षी कारखाना विस्तार करणार असून प्रतिदिन १२५०० टन गाळपाचे उद्दीष्ट असणार आहे. दराच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाहीत.

कारखाना अन्य उत्पादितेही तयार करणार आहे. कोजनेरेशन प्रोजेक्ट हाती घेणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी माफक दरात खते- औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कारखानास्थळी व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बारामती ऍग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले की, चार-पाच वर्ष शेतीच्या बाबतीत कर्जत- जामखेडमध्ये आपण काम करतोय. दोन्ही तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामाच्या निमित्ताने शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली.

शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी, याकरीता राज्यभर व परराज्यात फिरून दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी आपण प्रयत्न केला. चांगले उत्पन्न मिळाले. दर्जेदार वाणांचे बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध झाले. त्यामुळे कर्जत- जामखेड मधील शेतकऱ्यांना अन्यत्र दर्जेदार बियाण्याचा शोध घेण्याची गरज पडणार नाही.

दुर्जदार बियाण्याचा आपण प्रोत्साहित करतो आहोत. शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढविताना अन्य खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा मौलिक सल्ला पवार यांनी दिला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office