अहमदनगर बातम्या

केवळ दिवे लावून, तालुक्यातील सहकारी संस्था बंद पडणाऱ्यांनी आ.तनपुरेंवर टीका करू नये; तनपुरे यांची माजी आ.कर्डीले यांच्यावर टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मागील दहा वर्षात काही न करता केवळ दिवे व सभामंडप एवढेच काम करून साडेचार वर्ष झोपी गेलेल्या आपल्या नेत्यांना आता जनतेने नाकारले आहे. ज्यांनी दहा वर्षात नगरपरिषदेला कधी एक रुपया आमदार निधीतून दिला नाही तेच आता आ. प्राजक्त तनपुरेंनी प्रयत्नपूर्वक २९ कोटीची पूरक पाणी योजना सह भुयारी गटावर इतर कामे जी मार्गी लावली त्याचे श्रेय घेत आहेत .

आपल्या मंत्रिपदाचा उपयोगातून जास्तीत जास्त शेती व शेतकरी सुसह्य होण्यासाठी ऊर्जा खात्यासंबंधातील कामे पूर्ण करून घेतली. परंतू चार वर्षे झोपी गेलेले निवडणुका येतात याच कामांचे श्रेय घेताना उद्घाटनाचा अट्टाहास करीत आहेत.

मुळा-प्रवरा नेमकी कोणी बंद पाडली? त्यावेळी पाच वर्षे कोण चेअरमन होते? तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांशी नेमके कोणाचे वैयक्तिक वाद होते व यातून संस्था कशी गेली हे सर्वज्ञात असताना प्रीपेड कार्यकर्ते इतरांवर आरोप करीत आहेत.

ही बाब हास्यास्पद असल्याची खिल्ली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भारत तारडे, नंदकुमार तनपुरे यांनी कर्डीले यांचे नाव न घेता संयुक्त पत्रकातून उडविली आहे.

पुढे त्यांनी नमूद केले आहे, गेल्या दहा वर्षात राहुरीच्या ना रुग्णालयाचा विषय, ना शासकीय इमारतींचा विषय विधानसभेत निघाला. ना बसस्थानकाचा विषय मार्गी लागला. गेल्या पाच वर्षात आ. प्राजक्त तनपुरे यांनी अभ्यासपूर्वक मांडणी करून या विषयांना चालना दिली.

रुग्णालयाबाबत स्वतः गावात रुग्णालय होण्यासाठी जागेबाबतचे वाद सोडवले. विधानसभेत यासाठी प्रश्नही उपस्थित केले. परंतू, विधानसभेत व अपघाताने एकदा मंत्री पदही मिळालेले यांचेच लोकप्रतिनिधी कधीही विधानसभेत प्रश्नावर बोलताना जनतेला दिसले नाही.

सहकारी सूतगिरणी नेमकी कोणाच्या काळात बंद पडली? पीपल्स बँक कोणी घालवली? राहुरी कारखान्याला केवळ राजकीय हेतू ठेवून ४४ कोटींचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा बँकेचे कर्ज हे आज कारखाना अडचणी त येताना कारणीभूत ठरले आहे. मग हे नेमके कोणी व कशासाठी केले? याचा शोध आरोप करताना हुशार कार्यकर्त्यांनी घ्यावा व मग तनपुरेंवर आरोप करावे.

राहुरीतील जनता हुशार आहे. तुम्हाला स्पष्टपणे नाकारलेले आहे. निळवंडे कालव्याचे खोटी भूमिपूजन कोणी केली? आ. तनपुरे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात साडेबाराशे कोटीचा निधी आणून हे काम कोणी मार्गे लावले? यांना राहुरीचे काही घेणेदेणे नाही. फक्त राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा लोणी व नगरच्या नेत्यांना राहुरीचे तारणहार म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची किव करावी तेवढी थोडीच आहे.

परंतू, निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी करून मिळालेले राज्याच्या सत्तेतून काहीही न करता हे सर्व आम्हीच केले, असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न जो होत आहे. त्याला जनता पुरेपूर ओळखून असून दोन महिन्यानंतर मतदानातून जनता या प्रश्नाचे उत्तर नक्की देईल, असा विश्वास व्यक्त केला.

Ahmednagarlive24 Office