ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते स्वतःच्या राजकीय राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले आणि मिंधे झाले. अशी टीका शिवसेनेच्या विधानसभा विस्तारक राहुल ताजनपुरे यांनी केली.
गुरुवारी कोपरगाव येथे युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. निरज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेतील नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव येथील युवा सेनेच्या आढावा बैठकीत ताजनपुरे बोलत होते.
राहुल ताजनपुरे म्हणाले की, या भागात युवा सेनेचे पदाधिकारी नेमले नसल्याचे सैनिक विना सेनापती काहीच करू शकत नाही हे मला लोकसभेला प्रकर्षाने जाणवले.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेना हे सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या युवकांसाठीचे व्यासपीठ निर्माण केले असूनही येत्या आठ दिवसांत आपल्या सर्वांच्या साथीने नवीन युवा सेना उभी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी गगन हाडा, असलम शेख, भरत मोरे, शहरप्रमुख सनी वाघ, कलविंदरसिंग दडियल, मुन्ना मंसूरी, भूषण पाटणकर, बालाजी गोरडे, विजू गोरडे, गणेश जाधव, सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, शेखर कोलते, प्रसाद सूर्यवंशी, काना हाडा, गौतम निंदाने, स्वप्निल निर्भवणे, विनय टाक, राहुल हाडा, अतुल बाराहाते, निखिल कंकाळे, सिद्धांत छल्लारे, कैलास लष्करे, गणेश सावंत, राजू सय्यद, आकाश निकम, पल्लू राम घारू, सोमनाथ निर्भवणे, चेतन हाडा,
साहिल पटवेकर, चेतन नंदाने, संदेश निकम, रितेश वागिले, वसीम चोपदार, प्रतीक मोरे, मुकेश रेटे, आकाश कानडे, महेश लोंढे, चेतन उपाध्ये, समीर पटवेकर, राहुल गुडेकर, इमरान शेख, याकुब शेख, दिनेश मरसाळे, भोले पवार, समीरा आत्तार, हाफिस मन्सुरी, जीवन बाराहते, ओम ठोंबरे, वैभव शेलार, योगेश पवार, शाबाद शेख, अतुल अवताडे, संदीप हाडा, साई बुवा, मुकेश वाणी, लोकेश हाडा उपस्थित होते.
सूत्रसंचालन सिद्धांत छल्लारे यांनी केले तर, गगन हाडा यांनी आभार मानले. यावेळी गगन हाडा म्हणाले, मी वक्ता नाही पण विरोधकांचा न बोलता तक्ता बदलू शकतो. कारण मी निष्ठावंत शिवसैनिक आहे.
युवा सेनेचा उत्तर नगर जिल्ह्यात मोठा विस्तार करण्यासाठी मी रक्ताचं पाणी करेल. मला पदाची अपेक्षा नाही पण येत्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघात भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. असेही गगन हाडा यावेळी म्हणाले.