अहमदनगर बातम्या

नगर शहरातील खाजगी दवाखान्यात कोविड लसीचे हजारो डोस पडून

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे साधन ठरले आहे. यामुळे देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे.

यातच नगर जिल्ह्यात देखील लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अहमदनगर शहरात खाजगी दवाखान्यात कोविड लसीचे हजारो डोस पडून असून मुदतबाह्य होण्याच्या आत सरकारने या बाबत काहीतरी निर्णय घ्यावा अन्यथा डोस द्यावे लागतील फेकून द्यावी लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात काही महिन्यांपूर्वी कोरोना लसीकरण केंद्रावर लांबचलांब रांगा पाहायला मिळत होत्या सरकारी यंत्राने पडत असलेला ताण पाहून खाजगी हॉस्पिटलने पुढाकार घेऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू केलं.

खाजगी हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन लस घेण्याचं प्रमाण कमी असलं तरी काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये लस घेतली.

आता शासकीय आरोग्य केंद्रात कोरोना लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये कोणी लसीकरण करण्यासाठी येत नाही अशात हॉस्पिटलने खरेदी केलेल्या कोरोना लसीचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक रहात आहे.

नगर शहरात जवळपास 13 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या लसीची एक्सपायरी डेट देखील जवळ आली आहे. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलची ही लस कंपणीने वापस घ्यावी किंवा सरकारने घेऊन आवश्यक असलेल्या भागात पाठवावी अशी अपेक्षा डॉ.प्रशांत पटारे यांनी व्यक्त केली आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office