Ahmednagar Crime : शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी ! भाऊसाहेब शिंदे विरोधातगुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुंडेगाव (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र प्रमुखांच्या उपस्थितील शिक्षकांच्या सुरु असलेल्या बैठकीत स्वयंघोषीत समाजिक कार्यकर्ता असणाऱ्या भाऊसाहेब शिंदे (रा. गुंडेगाव) याने अडथळा निर्माण करत शिक्षकांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली.

माझे राज्यातील नेत्यांशी संबंध असून, तुमच्याकडे पाहुन घेतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात शिक्षक विजय सुदाम कडूस यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भाऊसाहेब शिंदे विरोधात भादंवि कलम ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुंडेगाव येथील प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख मंदा जगताप (माने) यांनी २३ डिसेंबर रोजी १२ वाजता शिक्षकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीस शालेय पोषण आहार अधीक्षक प्रदीप शिंदे, केंद्रप्रमुख मंदा जगताप, संजय शेलार, ईश्वर नागवडे, सुहास बोठे, भाऊसाहेब जाधव, संगीता भुजबळ, दिपस्वी पवार, शुभांगी मोरे, मनिषा भालसिंग, ज्ञानदेव कुसळकर, अलका शिरसागर, मंदा शिंदे, गहिनीनाथ पिंपळे, विलास कदम, प्रतिभा निक्रड, जयश्री दिवटे, पद्मावती धुमाळ आदी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

बैठकीत विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा होत असताना सव्वा बाराच्या वाजेच्या सुमारास भाऊसाहेब शिंदे आला. दारातच खुर्ची टाकुन बसला. शाळेवर व्यवस्थीत काम करत नाही. तुम्ही शाळेत उशिरा येतात. तुमच्या शाळेत दिला जात असलेला पोषण आहाराचा दर्जा खराब आहे, असे प्रश्न करत शिक्षकांना वेठीस धरत होता.

यावेळी शिक्षक गहिनीनाथ पिंपळे यांनी शिक्षकांच्या बैठकीत बाहेरच्या व्यक्तींना बसण्याचा अधिकार आहे का ? असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे याने ‘तुम्हाला लाज वाटते का? घरभाडे फुकट घेता’, असे म्हणत बैठकीत व्यत्यय आणला.

विनाकारण आमच्या बैठकीत व्यत्यय का आणतो? असे विचारले असता, तुम्हाला काय करायचे आहे ? मी कलेक्टर साहेबांना ओळखतो, तुमची बदलीच करतो, अशी धमकी दिली. शिक्षिका धुमाळ यांनी भाऊसाहेब शिंदे यास ‘का आमच्यामध्ये व्यत्यय आणतो’, असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे हा धुमाळ यांच्यावर धावुन गेला.

आम्ही त्यास असे का करतो? असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे यांनी माझी कॉलर धरून मला जीवे मारण्याची धमकी देऊन आमची मिटींग होऊ दिली नाही. त्यानंतर मी शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना रस्त्यात अडवून मला शिविगाळ केली व म्हणाला की, तुला काय करायचे ते करुन घे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत तेथून निघून गेला.