अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहराला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आहे. त्यात ऐतिहासीक भूईकोट किल्ला म्हणजे नगराचे भूषण. परंतु आता याच किल्ल्याची संरक्षक कठड्याची भिंत कोसळली असून तटबंदीलाही धोका निर्माण झाला आहे.
हा ऐतिहासीक ठेवा जतन करण्याची मागणी हरियाली संस्थेने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. राज्य सरकार व तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या पुढाकाराने 2011 मध्ये खंदकाच्या भिंतीवर दगडाचे मजबूत कठडे बांधण्यात आले.
इतके दिवस ते अबाधित आणि सुस्थितीत होते. दुर्दैवाने त्याची आता पडझड सुरू झाली आहे. या ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे असल्याने भिंतीची व कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, विष्णू नेटके आदींनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यंदा मुबलक पावसाने खंदकात व खंदकाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले व मुरले. त्यामुळे पाच नंबरच्या बुरुजाजवळील खंदकाची 8 फूट रुंद आणि 55 फूट लांब असलेली भिंत व त्याचे कठडे खचून खंदकात 25 फूट खाली कोसळले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved