अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील आदर्श गाव वडुले येथे फिर्याद मागे घ्यावी या कारणावरुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.
याबाबत परस्परविरोधी फिर्यादीवरुन सरपंचांसह दोन्ही बाजूच्या 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर यामधील दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला आहे.
कैलास बबन पवार (वय 43) धंदा- शेती रा. वडुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नामदेव नरोटे व एकनाथ नरोटे दोन्ही रा. वडुले ता. नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वडुले येथे येडूमाता देवस्थान चौकात फिर्यादी यास आरोपी यांनी मागील फिर्याद मागे का घेत नाही? असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे करत आहेत.
तर दुसरी फिर्याद नामदेव भिमाजी नरोटे यांनी दिली असून त्यावरुन कैलास बबन पवार, कुमार जगन्नाथ पवार, एकनाथ भिमा माळी, बाळासाहेब शेषराव पवार, बबन शंकर देशमुख व दिनकर गर्जे सर्व रा. वडुले ता. नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.