अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरातील गजबजलेल्या बाजार समितीजवळ एका निवृत्त शिक्षकाचे तब्बल साडेतीन तोळ्यांचे दागिने घेवून दोन चोरटे फरार झाले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी कि, बुधवारी (ता.6) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोविंदनगर परिसरात राहणारे निवृत्त शिक्षक कारभारी पुंजीराम पानसरे संगमनेर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरुन जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले.
‘आम्ही पोलीस आहोत, मंगळवारी संगमनेर पोलिसांनी गांजा तस्करांवर कारवाई केली असून, शहरात तपासणी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा’ अशी सूचना त्या दोघा भामट्यांनी त्या सत्तरवर्षीय वयस्कर निवृत्त शिक्षकाला केली. त्यांनी दोघांवर विश्वास दाखवला.
आपला हातातील पिशवी चक्क त्या भामट्यांच्या हाती दिली त्या पिशवीमध्ये साडेतीन टोळ्यांचे दागिने होते. ते दागिने घेऊन दोघे चोरटे पसार झाले. या घटनेनंतर संबंधित शिक्षकाने आरडाओरड केल्याने आसपासचे अनेकजण तेथे गोळा झाले. मात्र चोरटे तो पर्यंत फरार झाले.
त्यानंतर सत्तरवर्षीय शिक्षक यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान शहरातील चोरीचा हा जुना मात्र नव्याने घडलेला प्रकार पोलिसांसमोर आव्हान म्हणून उभा राहिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक खाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.