Ahmednagar News : कुरिअर बॉयला लुटणाऱ्या तिघांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यातील देवदैठण बेलवंडी रस्त्यावर कुरिअर पार्सल वाटप करणाऱ्या राजेंद्र काकडे कुरिअर बॉयची दुचाकी अडवत तीन चार अज्ञात चोरट्यांनी लाथा बुक्क्याने मारहाण करत ३ हजार ३०० रुपयांचे पार्सल चोरुन नेणाऱ्या दोघांना बेल वंडी पोलिसांनी अटक करत ८३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दि. १४ जुलै रोजी देवदैठण बेलवंडी रस्त्यावर राजेंद्र काकडे या कुरिअर बॉयची गाडी तीन चार अज्ञात चोरट्यांनी अडवत त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ३ हजार ३०० रुपयांचे कुरिअर पार्सल कटरच्या सहाय्याने कापून चोरुन नेल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करत असताना ही चोरी देवदैठण परिसरातील हर्षवर्धन शशिकांत बनकर, रोहन रमेश ससाने व स्वप्नील रमेश कोरके सर्व रा. देवदैठण यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करत पोलिसांनी आरोपींना ११ ऑगस्ट रोजी अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दिलेल्या पोलिस कोठडीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरुन नेलेले ३ हजार ३०० रुपयांचे पार्सल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.