अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-शिर्डी शहरात एका उपनगरात राहत असलेली एका अल्पवयीन मुलगी घरात जात असताना तिला हाताला धरून मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निघोज गावातील बाळासाहेब प्रभाकर महाले तसेच एका मुलीसह महिलेने त्या अल्पवयीन मुलीला पकडून उचला हे लोक फार माजले आहेत असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा बाळासाहेब प्रभाकर महाले यांच्यासह अन्य दोघांवर पोस्को व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हे दाखल केला आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे ,प्रवीण दातरे यांनी भेट दिली असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24