गौणखनिजच्या माध्यमातून तीन कोटींचा महसूल जमा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण असूनही शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड – पागिरे यांनी समाधानकारक काम केले.

दि.२२ जानेवारी २०२१ अखेर गौणखनिजच्या माध्यमातून त्यांनी तब्बल २ कोटी ९९ लाख ७०हजार रुपयांचा महसूल गोळा करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

गावोगावच्या रस्ता केसेसमध्ये त्यांनी आजवर ५० ठिकाणचे स्पॉट इन्स्पेक्शन केले असून, ३७ केसेस निकाली काढल्या आहेत. तर ७ शिवरस्ते मोकळे केल्याने स्थानिक रहिवाशांचा वहिवाटीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या ४८ हजार ५०० हेक्टर बाधित क्षेत्राचे ४८ कोटी ५० लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली आहे.

शेवगाव तालुक्यात कोरोना विषाणूचे १९०० रुग्ण आढळून आले. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या टीममुळे उर्वरित रुग्ण औषधोपचाराने पूर्णत: बरे झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी म्हणून सुरळीत व शांततेत पार पडली. महिला अधिकारी म्हणून या कामाचा आपल्याला अभिमान आहे.

आखेगाव, खरडगाव, वडुले, वाघोली, लोळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव, मुंगी, पिंगेवाडी, देवटाकळी, या नदीपात्रातील वाळू साठ्याचे लिलाव करून महसूलात वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे भाकड – पागिरे यांनी’ बोलताना सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24