अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- ऊस तोडणी मुकादम म्हणून काम करत असलेले प्रल्हाद वणवे दि. १३ जुलैला श्रीगोंदा फॅक्टरी येथून तीन लाख रुपये घेऊन घरी निघाले. ते पैसे त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवले होते.
मात्र चांदा (ता. कर्जत) गावच्या शिवारातून जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे प्रल्हाद वणवे यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते झाडाखाली थांबले.
तेवढ्यात एका नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या आणि त्यांनी प्रल्हाद वणवे यांच्या दुचाकी शेजारी आपली दुचाकी लावली.
वणवे यांचे दुचाकीकडे लक्ष नसल्याची संधी साधत त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये, वेगवेगळ्या बँकेचे पासबुक, चेकबुक या चोरटयांनी चोरून नेले.
या प्रकरणी प्रल्हाद अश्रुबा वणवे (रा. पाटण सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक बबन दहिफळे करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews