Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बेलवंडीसह तीन एमआयडीसी मंजूर ! आयटी, ऑटोमोबाईल प्रकल्प, हजारो रोजगार.. नगर बनतेय ‘उद्योगनगरी’

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोक नेहमीच नोकरीसाठी पुण्यात, रांजणगाव या ठिकाणी जाताना दिसतात. कारण त्याठिकाणी एमआयडीसी असल्याने नोकऱ्या उपलब्ध होतात. नगरचा भाग दुष्काळी भाग म्हणून गणला गेला होता.

परंतु आता अहमदनगर कात टाकत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या आहेत. तर चौथी कर्जत जामखेड ही अद्याप प्रोसेसमध्ये आहे.

वडगाव गुप्ता, शिडीं, बेलवंडी येथे मंजुरी मिळाली आहे. नगर जिल्हा आता उद्योगांचे केंद्रबिंदू बनणार आहे. पुढील काही वर्षात येथे ऑटोमोबाइल, आयटी व कृषी क्षेत्रातील उद्योग येणार आहेत.

त्यामुळे या उद्योगांतून पुढच्या चार वर्षात हजारो रोजगार उपलब्ध होतील असे म्हटले जात आहे. शिर्डी, वडगाव गुप्ता या ठिकाणच्या एमआयडीसींसाठी जागा उपलब्ध असून बेलवंडी साठी श्रीगोंदे तालुक्यातील वेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिन उपलब्ध होणार आहे.

दुष्काळाचाही होणार विचार

नगर तालुक्याची कायम दुकाळी म्हणून ओळख. त्यामुळे वडगाव गुप्ता व श्रीगोंद तालुक्यातील बेलवंडी येथे नव्याने औद्योगिक वसाहत उभारली जाणार असल्या तरी या ठिकाणी कमी पाणी लागणारे उद्योग उभारले जाणार आहेत.

प्रामुख्याने ऑटोमोबाइल क्षेत्राला पाणी कमी लागत असल्यामुळे हे उद्योग तेथे येणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

जपानी उद्योगांची रेलचेल अन नगरच्या विकासाचे विस्तारीकरण

नगर शहरात एमआयडीसीचे शेती विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी प्रस्तावित होती. २० वर्षापासून नगरच्या एमआयडीसीचा विस्तार लांबणीवर पडला होता. वडगाव गुप्ता येथे उद्योगासाठी २०० एकर जागा मिळत असल्यामुळे नवीन उद्योग येतील, त्यामुळे शहराच्या दृष्टीने ही सुधारण्याची मोठी संधी राहील.

तसेच सुपा एमआयडिसीतील जपानी इंडस्ट्रीज पार्कमध्ये असलेल्या उद्योगांची कनेक्टिव्हिटी भविष्यात बेलवंडी येथे होणाऱ्या नव्या एमआयडीसतील उद्योगांसाठी पूरक ठरणार आहे.

विशेषतः वाहतुकीच्या दृष्टीने बेलवंडीपर्यंत रेल्वेमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे उद्योगांमधून निर्मित होणाऱ्या मालाची निर्मिती या दळणवळणामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा मोठा विकास येणाऱ्या भविष्यकाळात होईल यात शंका नाही.

Ahmednagarlive24 Office