तीन अल्पवयीन मुलांना पळवले : पालकवर्गात खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. आता पुन्हा राहुरी तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

तर अकोले तालुक्यातील एका लग्नातून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेण्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

राहुरी तालुक्यातील एका परिसरात असणाऱ्या शेताजवळून रविवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एकाने मोटारसायकलवरून पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील एका नातेवाईकांच्या लग्नामध्ये आलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञाताने लग्नामधूनच फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगा पुण्यात शिक्षण घेत होता. तो नुकताच नातेवाईकांमधील एका मुलीच्या लग्नाला आला होता. गावामध्ये असलेले लग्न आटोपल्यानंतर मुलाची आई घरी गेली. परंतू सदर अल्पवयीन मुलगा लग्न आटोपून रात्री १२ वाजले तरी घरी आला नाही.

मुलाच्या आई वडीलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो न मिळाल्याने कोणीतरी त्याला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून मुलाच्या वडीलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मुलाला पळवून नेणाऱ्या अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe