अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे शुक्रवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला. नवे १८७ रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२५५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६, खासगी प्रयोगशाळेत ४७ आणि अँटीजेन चाचणीत ९४ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, अकोले २, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, नेवासे २, शेवगाव १ , श्रीगोंदे ३, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १ रुग्णाचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १५, अकोले २ जामखेड ५, कर्जत २, कोपरगाव २, नगर ग्रामीण १, नेवासे १, पारनेर ३, पाथर्डी १, राहाता ७, संगमनेर ५, श्रींगोंदे १, श्रीरामपूर २ रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत ९४ जण बाधित आढळून आले.
यामध्ये मनपा हद्दीतील २४, कर्जत २, कोपरगाव २, नेवासे १, पाथर्डी ६ , राहाता ९, राहुरी २, संगमनेर १९, शेवगाव १०, श्रीगोंदे ११, श्रीरामपूर ७, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी १२४ कोरोना रुग्णांना जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ९७४ इतकी झाली आहे.