अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही जिव वाचले आहेत व नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
धामणगाव (देवीचे), पाथर्डी शहर व मिडसांगवी गावात ह्या घटना सोमवारी (दि.४) रात्री घडल्या आहेत. धामणगाव येथील राजेंद्र रघुनाथ काळे (वय ४०) यांनी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना कुटुंबातील व्यक्तींनी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन त्यांना नगर येथे पाठविण्यात आले.
शहरातील नाथनगर येथील अविनाश संतोष काळे (वय १६) याने व मिडसांगवी येथील जावेद आबजा सय्यद (वय ३०) या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांनाही नगरला उपचारासाठी पाठविण्यात आले.
एकाच रात्रीत तीन घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाने याबाबत पोलिसांना माहिती कळविली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®