अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
असाच एक प्रकार नेवासा तालुक्यात घडला आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पानेगाव येथे राहत्या घरात बाथरूम समोर येत एका महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची फिर्याद दाखल झाली.
यावरून ज्ञानेश्वर सूर्यभान खडके, रामचंद्र ज्ञानेश्वर खडके व एका महिलेवर असभ्य वर्तन मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अधिक तपास हवालदार लबडे करत आहेत.