अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात अद्यापही ऑक्सिजनचा तुटवडा कायम असला तरी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. काल मंगळवारी तीन टँकरमधून ५० मेट्रिक टनचे तीन टँकर नगरला पोहोचले.
त्यामुळे सोमवारची तूट मंगळवारी भरून निघाली असली तरी रात्री पुन्हा ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता असल्याने उद्योजकांकडून ऑक्सिजसाठी धावपळ सुरूच होती.
सध्या वाढते कोरोना संक्रमण व ऑक्सिजन बेडवरील बाधित यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूची उपलब्धता करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
दरम्यान मंगळवारी जिल्ह्यास तब्बल ५० मेट्रीक टन प्राणवायू अर्थात ऑक्सिजन प्राप्त झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर (१३), हायटेक, एमआयडीसी, नगर (७ + १४), अहमदनगर गॅस,
एमआयडीसी (१३) आणि बालाजी, संगमनेर (३) याप्रमाणे प्राप्त साठा देण्यात आला. ऑक्सिजन बेडवरील रुग्णांसाठी हा प्राणवायू संजीवनीच ठरत आहे.