Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

बॅटऱ्या चोरणारे तिघे जेरबंद : गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या एक्स्चेंजमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील तिघे संशयित श्रीरामपूरमध्ये जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत अधिक माहिती अशी, राहाता तालुक्‍यातील रांजणगाव येथे बीएसएनएलचे एवस्चेंज आहे. येथील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या स्क्रॅब बॅटऱ्या खोलीचा कडी-कोयंड तोडून चोरी केल्या होत्या. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याच्या तपासाच्या सूचना जिल्हा पोलीस अधोक्षक राकेश ओला यांनी दिल्या होत्या. तपासादरम्यान आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळली, कि हा गुन्हा आरोपी लुकमान शहा याने त्याच्या दोन साथीदारासमवेत विकण्यासाठी फातिमानगर येथे येणार आहेत.

पथकाने श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक दोनमधील फातिमानगर येथे सापळा लावला. थोड्याच वेळात एक पांढऱ्या रंगाचा पिकअप येताना पोलिसांना दिसला. त्याला थांबवून तपासणी केली असता पिकअपमध्ये तिघे जण आढळून आले.

तिघांनी आपली नवे लुकमान इसाक शहा, वसीम गफार शेख व राजीक असिक पठाण असे असल्याचे सांगितले. चौकशी केली असता, त्यांनी या बॅटऱ्या रांजणगाब येथील बीएसएनएलच्या एक्स्चेंजमधून चोरल्याचे सांगितले.

तिन्ही आरोपींकडून २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या १६ बॅटऱ्या व पाच लाख रुपये किंमतीचा पिकअप, असा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, हेकॉ. मनोहर गोसावी, कॉ.सागर ससाणे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, जालिंदर माने, बबन पाल आदींनी केली.