अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. या घटनेने सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला.
बाबासाहेबांचे विचार हे समाजासाठी अत्यंत प्रेरक असून ते त्यांच्या भव्य स्मारकाच्या माध्यमातून समाजातील तरुणांसह सर्व घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी काळे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, नगर शहरामध्ये डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करणे ही काँग्रेस पक्षाची मागणी असून हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे,
डॉ. रिजवान अहमद, निजामभाई जहागीरदार, खलीलभाई सय्यद, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, प्रशांत वाघ, अनिसभाई चुडीवाल, इम्रान बागवान, अमित भांड, ॲड. सुरेश सोरटे,
अण्णासाहेब गायकवाड, सुहास साठे, सुरेश नवगिरे, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे यांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्लाट यावेळी बोलताना म्हणाले की,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरक विचार काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचे काँग्रेस पक्ष आगामी काळात काम करणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved