Ahmednagar News : हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच तालुक्यात खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर अंडी फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
लोकसभेच्या सुरु असलेल्या अधिवेशनात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिर म्हणून समजल्या जाणाऱ्या संसदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप व हिंदुत्ववादी संघटनेतर्फे संगमनेर बसस्थानकावर खा. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेवर काळी शाई फासून, अंडे फेकून, पायदळी तुडवत निषेध करण्यात आला.
खा. राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवले. त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. संगमनेर येथे खा. राहुल गांधींच्या प्रतिमेवर काळी शाई टाकून, प्रतिमेला अंडे फेकून मारत कार्यकर्त्यांनी पायी तुडवित आंदोलन केले.
यावेळी निवडणूक प्रमुख अमोल खताळ, रोहिदास साबळे, राजेंद्र सांगळे, शशांक नामन, शैलेश फटांगरे, वरद बागुल, भगवान गीते, भारत गवळी, सुरेश लांडगे, दिलीप रावल, वाल्मीक शिंदे, शुभम लहामगे, शंकर वाळे, हरीश वलवे, संदेश देशमुख, रोहिदास गुंजाळ, नवनाथ जोंधळे, संतोष हांडे, सोमनाथ नेहे, सतीश गोपाळे, पवन शिरतार, बाबासाहेब गुळवे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे जेष्ठ नेते असून ते विद्यमान आमदार देखील आहेत. त्यांच्याच तालुक्यात खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर अंडी फेकण्यात आल्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.