अहमदनगर बातम्या

तिसगाव – करंजीत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जोरदार तयारी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलने, उपोषणे करणारे मराठा योद्धा म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली असे मनोज जरांगे पाटील शनिवारी (दि.७) पाथर्डी तिसगाव करंजीमार्गे अहमदनगरकडे मार्गस्थ होणार आहेत.

त्या अनुषंगाने तिसगाव करंजी या ठिकाणी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.मनोज जरांगे पाटील यांचे शनिवारी सायंकाळी चार वाजता तिसगाव येथे आगमन होणार असून तिसगावसह परिसरातील विविध गावचे मराठा समाज बांधव या ठिकाणी त्यांचे स्वागत करणार आहेत.

त्यानंतर उपबाजार समिती तिसगाव या ठिकाणी ते मराठा समाज बांधवांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यानंतर करंजी येथे त्यांचे एसटी बस स्थानक या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने स्वागत केले जाणार असून त्यानंतर उत्तरेश्वर सभामंडपामध्ये उपस्थित मराठा समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत.

तिसगाव, करंजी, पाथर्डी या ठिकाणी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी मराठा समाज बांधवांनी केली असून या नियोजनात कुठे कमी भासू नये यासाठी मराठा समाज बांधवांनी मंगळवारी तिसगाव ग्रामपंचायत कार्यालयात परिसरातील पंधरा-वीस गावच्या मराठा समाज बांधवांची संयुक्त बैठक घेतली.

त्यांच्या सभेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले तर बुधवारी करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात करंजीसह परिसरातील दहा-पंधरा गावच्या मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या स्वागताचे नियोजन केले.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची मोठी तयारी पाथर्डी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेली असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिसगाव करंजी या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र येणार आहेत.

Ahmednagarlive24 Office