अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ४३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४४ हजार ४३६ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४८८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०१ आणि अँटीजेन चाचणीत ४६ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले १०, कोपरगाव ०२,
नेवासा ०२, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, कर्जत ०४, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०२, नेवासा ०२, पारनेर ०१, राहता १४, राहुरी ०६,
संगमनेर ०९, शेवगाव ०५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले ०२, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०१, राहता ०६,
राहुरी ०४, संगमनेर ०३, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २४,
अकोले १६, जामखेड ०३, कर्जत २२, कोपरगाव २०, नगर ग्रा. ३१, नेवासा ०९, पारनेर ३६, पाथर्डी ०७, राहाता ३९, राहुरी १२, संगमनेर १४७, शेवगाव १३, श्रीगोंदा २३, श्रीरामपूर १५, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,४४,६३६
उपचार सुरू असलेले रूग्ण:१४८८
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९९८
एकूण रूग्ण संख्या:३,५३,१२२
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)