अहमदनगर बातम्या

आज ५७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६४८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५५ आणि अँटीजेन चाचणीत ०९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून रुग्णामध्ये अकोले ०३, जामखेड ०१, कर्जत २०, कोपरगाव ०६, नगर ग्रा. ०१, नेवासा ०३, पारनेर ०३, राहुरी ०३, संगमनेर ०६ आणि श्रीगोंदा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहता ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ०९ जण बाधित आढळुन आले.

मनपा ०१, अकोले ०१, नगर ग्रा ०१, नेवासा ०१, पाथर्डी ०१, राहता ०२ आणि शेवगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०५,

अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०५, नेवासा ०५, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता ०८, राहुरी ०७, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०७ आणि श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Ahmednagarlive24 Office