आज ६३१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३६५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ६३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार २१४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ९४४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८७ आणि अँटीजेन चाचणीत १०२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०८, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२,

नेवासा ०२, पारनेर २२, पाथर्डी ०१, संगमनेर ३३, श्रीगोंदा ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०२, जामखेड ०९, कर्जत ०३, कोपरगाव १३,

नगर ग्रा. १७, नेवासा ०७, पारनेर ०७, पाथर्डी ०६, राहता २७, राहुरी १५, संगमनेर ०३, शेवगाव १८, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १०२ जण बाधित आढळुन आले. अकोले ०६, जामखेड ०४, कर्जत ०६,

कोपरगाव १६, नगर ग्रा. ०८, नेवासा १३, पारनेर ०३, पाथर्डी ०३, राहता ०६, संगमनेर ०५, शेवगाव १५, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २८, अकोले १९, जामखेड १८, कर्जत ३१, कोपरगाव २७,

नगर ग्रा. ५३, नेवासा २०, पारनेर १२४, पाथर्डी २४, राहाता ४४, राहुरी २४, संगमनेर ८८, शेवगाव २५, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर ३०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,३९,२१४

उपचार सुरू असलेले रूग्ण:२९४४

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९१८

एकूण रूग्ण संख्या:३,४९,०७६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)