Ahmednagar News : आज मनोज जरांगेंसह लाखो मराठे नगरमध्ये ! अप्पर पोलिस अधीक्षक, एसआरपीएफ, सीआयएसएफ…’असा’ असणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत काल मुंबईकडे कूच केले. ही पदयात्रा आज (२१ डिसेंबर) नगर जिल्ह्यात येणार असून नगरमध्ये बारबाभळी येथे मुक्कामी असेल. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून ते नगर शहर व पुढे सुपामार्गे ही यात्रा जिल्ह्यात १३० किलोमीटर अंतर कापत पुणे जिल्ह्याकडे २२ तारखेला रवाना होईल.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने १४४ अधिकारी व १२७७ कर्मचारी, तसेच आरसीपी, क्यूआरटी, एसआरपीएफ, सीआयएसएफ, बीडीडीएसची आठ पथके, ३७ वाहने असा मोठा पोलिस बंदोबस्त यात्रा मार्गावर तैनात केला आहे.

जरांगे पाटलांची पदयात्रा आज तनपुरवाडी मीडसांगवी मार्गे नगर जिल्ह्यात येत आहे. करंजी घाट मार्गे नगर शहराजवळ बाराबाभळी येथे ५५ एकर क्षेत्रामध्ये ही यात्रा मुक्काम करणार आहे. उद्या (२२ डिसेंबर) सकाळी ही यात्रा सुप्याकडे जाईल तेथे दुपारी आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली असून तेथे जेवण करून दुपारनंतर ही यात्रा शिरूर बायपास मार्गे रांजणगावकडे जाईल.

या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सज्ज आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून मार्गावर ठीक ठिकाणी फिक्स पॉईंटही उभे केले आहेत. वाहतुकीमध्येही बदल केला आहे.
ज्या मार्गावरून यात्रा जाणार आहे, त्या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नगर – पुणे महामार्गावरील वाहतूकही दोन्ही बाजूंनी बंद राहण्याची शक्यता असून ही वाहने पर्याय मार्गाने वळवण्याबाबत पोलिस प्रशासनाच्या वतीने नियोजन केले गेले आहे.

असा आहे पोलिस बंदोबस्त

दोन अप्पर पोलिस अधीक्षक, ८ पोलिस उपअधीक्षक, ३६ पोलिस निरीक्षक, ९८ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, ११८४ पुरुष पोलिस कर्मचारी, ५० महिला पोलिस कर्मचारी, ४३ वाहतूक शाखेचे कर्मचारी, २ आरसीपी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, २ एसआरपीएफ कंपन्या, १ सीआयएसएफ कंपनी, २ बीडीडीएस पथके असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.